• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

ByMirror

Jan 27, 2023

राज्यघटना प्रत्येक भारतीयांच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची दुवा ठरली -नगरसेविका शितल जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्ष कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. नगरसेविका शितल जगताप यांच्या हस्ते राष्ट्र ध्वज फडकाविण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, किसनराव लोटके, ओबीसी सेलचे अमित खामकर, व्यापार व उद्योग सेलचे अनंत गारदे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, वैद्यकिय सेलचे डॉ. रणजीत सत्रे, फारुक रंगरेज, किसन बेदमुथा, रेणुका पुंड, रुपाली पुंड, अमोल कांडेकर, गणेश बोरुडे, अथार खान, विशाल बेलपवार, संभाजी पवार, अभिजीत सपकाळ, संतोष ढाकणे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


नगरसेविका शितल जगताप म्हणाल्या की, भारत देशाने 26 जानेवारीला राज्यघटनेचा स्विकार करुन प्रगतीपथाकडे वाटचाल केली. घटनेने सामान्यांना मिळालेला मतदानाच्या अधिकाराने लोकशाहीचे प्रगल्भ राष्ट्र म्हणून भारत जगासमोर आला. राज्यघटना प्रत्येक भारतीयांच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची दुवा ठरली आहे. यामुळे समाजातील आर्थिक, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक विषमता नष्ट झाली. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मान मिळाला. आज महिला देखील राजकारणासह प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिध्द करत असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, भारतीय राज्यघटना केवळ राजकीय दस्तऐवज न राहता, प्रत्येक भारतीयांचा श्‍वास बनला आहे. शिक्षणाच्या समान संधी भारतीयांना मिळाल्याने देशाची प्रगती झाली. राजकीय लोकशाही परिपक्व होण्यासाठी कायद्याची जनजागृती होणे देखील अपेक्षित आहे. नागरिकांना आपल्या हक्काची व कर्तव्याची जाणीव झाल्यास एक परिपक्व लोकशाही राबविता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *