• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

युनिटीचा जेएफसी संघावर 5 गोलने दणदणीत विजय

ByMirror

May 24, 2022

फिरोदिया शिवाजीयन्स विरुध्द आंबेडकर एफसी रंगतदार सामना अनिर्णित


अ‍ॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अ‍ॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 स्पर्धेत सोमवारी (दि.23 मे) झालेल्या फिरोदिया शिवाजीयन्स विरुध्द आंबेडकर एफसी हा सामना अनिर्णित राहिला. तर दुसर्‍या सामन्यात युनिटीने जेएफसी संघावर 5-0 गोलने दणदणीत विजय मिळवला.


फिरोदिया शिवाजीयन्स विरुध्द आंबेडकर एफसी हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला होता. दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांना टक्कर देत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. दोन्ही संघाना एकही गोल करता आले नसल्याने हा सामना अनिर्णित राहिला.


दुसरा सामना युनिटी विरुध्द जेएफसी संघात खेळविण्यात आला. यामध्ये युनिटीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळीचे प्रदर्शन घडविले. युनिटी संघाकडून साहिलने 1 गोल तर सुशिल आणि सचिन याने प्रत्येकी 2 गोल करुन जेएफसी संघावर 5-0 गोलने विजय मिळवला. स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रसाद पाटोळे, सागर चेमटे, गणेश शिंदे, निरगुन घोडके यांनी काम पाहिले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *