• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

मुला-मुलींना सुशिक्षित करणार्‍या घरेलू महिला कामगारांचा सन्मान

ByMirror

Jan 4, 2023

तर शासनाच्या घरेलू कामगारचे अधिकृत नोंदणी कार्डचे वाटप करुन आरोग्याबाबत मार्गदर्शन

क्रांती असंघटित कामगार संघटनेचा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त घरकाम करुन आपल्या मुला-मुलींना सुशिक्षित करणार्‍या महिलांचा सन्मान करुन त्यांना शासनाच्या घरेलू कामगारच्या अधिकृत नोंदणी कार्डचे वाटप करण्यात आले. तर आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


वाडियापार्क क्रीडा संकुल येथील संघटनेच्या कार्यालया समोर हा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी व्याख्याते विठ्ठल बुलबुले, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रत्नाताई बल्लाळ, कल्पना बुलबुले, संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा, पद्मशाली महिला शक्तीच्या लक्ष्मी म्याना, सविता एकलदेवी, रोहिणी जिंदम, महिला बचत गटाच्या आयेशा शेख प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.


विठ्ठल बुलबुले म्हणाले की, समाज घडविणार्‍या महिलांचा सन्मान समाजात झालाच पाहिजे. समतेच्या विचाराने स्त्री शिक्षणाची चळवळ सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी चालवली. त्यामुळे आज बहुजन समाज प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे. मुलगी हे परक्या घराचे धन नसून, कुटुंबाचा सन्मान आहे. मुलींना चांगले शिक्षण देऊन, त्यांच्या पायावर उभे करण्याचे त्यांनी आवाहन केले. तर शिक्षणाने परिस्थिती बदलून प्रगती साधली जाणार आहे. शिक्षणासह कायद्याचे ज्ञान घेऊन आपल्या हक्काची जाणीव ठेवण्याचे त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. रत्नाताई बल्लाळ म्हणाल्या की, महिलांवर कुटुंबाचे आरोग्य टिकून असते. महिलांनी स्वतःचे आरोग्य सांभाळून कुटुंबाच्या आरोग्यासाठी योगदान द्यावे. सर्वसामान्य घटकातील कुटुंबीयांना आरोग्याप्रति जागरुक राहण्याची गरज आहे. अन्यथा मोठा आजार उद्भवल्यास संसार कोलमडून पडतो, असे सांगितले व महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.


कार्यक्रमासाठी कल्पना सामंत, सुनिता कुटे, आशा शिंदे, निर्मला भिंगारदिवे, सवित्रा धाडगे, प्रमिला रोकडे, उषा बोराडे, शोभा सातपुते, रेश्मा मिरपगार, संगिता मेहेर आदींसह घरेलू मोलकरीण कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *