• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात शालेय विद्यार्थ्यांसाठी आर.ओ. वॉटर प्लांटच्या कामाचे भूमीपूजन

ByMirror

Oct 21, 2022

विद्यार्थ्यांना मिळणार शुध्द पाणी

कमिन्स इंडिया फाऊंडेशन व ऐक्य सेवा सेंटरचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- गावातील शालेय विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळण्याच्या उद्देशाने निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ विद्यालयात आर.ओ. वॉटर प्लांटच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी रहावे, जलजन्य आजारांपासून विद्यार्थ्यांना मुक्ती मिळण्यासाठी कमिन्स इंडिया फाऊंडेशन व ऐक्य सेवा सेंटरच्या माध्यमातून शुध्द पेयजलकुंभाचा प्रकल्प उभारण्यात येत आहे.


या प्रकल्पाचे भूमीपूजन मुख्याध्यापक किसन वाबळे व भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी नगर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन साहेबराव बोडखे, तुकाराम वाखारे, सुभाष वाळुंजकर, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, तबाजी कापसे, अनिल कापसे, सचिन जाधव, अजय ठाणगे, अशोक डौले आदी उपस्थित होते.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे उपकुलगुरु डॉ. संजय सोनवणे व महेश ठाकुर यांच्या पाठपुराव्याने गावात शुध्द पेयजलकुंभ उभे राहत आहे. आजचे विद्यार्थी उद्याचा उज्वल भविष्य आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना देखील शालेय जीवनात चांगल्या सोयी-सुविधा निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.


साहेबराव बोडखे म्हणाले की, पाणी हा जीवनाचा अविभाज्य घटक असून, विद्यार्थ्यांना शुध्द पाणी मिळावे म्हणून हा उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहिल्यास त्यांचा बौध्दिक व शाररीक विकास होणार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी शुध्द पाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


पै. नाना डोंगरे यांनी शुध्द पाण्यासाठी शाळेत आरओ वॉटर प्लांट बसविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना शुध्द पाणी उपलब्ध होणार असून, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शालेय शिक्षक व पालकांनी या प्रकल्पाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *