• Tue. Jun 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात बैलपोळ्याची रंगली उत्साहात मिरवणुक

ByMirror

Aug 26, 2022

डोंगरे बहुद्देशीय संस्था व नवनाथ युवा मंडळाच्या वतीने मिरवणुकीतील शेतकर्‍यांचे स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे श्रावणी बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. दोन वर्षापासून कोरोनामुळे खंड पडल्यानंतर यावर्षी शेतकर्‍यांचा बैलपोळा सणात मोठा उत्साह दिसून आला. शेतकार्‍यांचा कामधेनू असलेल्या बैलांना आकर्षक सजवून गावातून ढोल, ताश्यांच्या गजरात गुलालाची उधळण करीत जंगी मिरवणुक काढण्यात आली.


बैलांना सजवून मिरवणुकीत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांचे बिरोबा मंदिर येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, बिरोबा देवस्थानचे भगत नामदेव भुसारे, दुध डेअरीचे चेअरमन गोकुळ जाधव, ग्रामपंचायत सदस्य किरण जाधव, संजय कापसे, सुनिल जाधव, संकेत कापसे, शैलेश कापसे, विकास निकम, सचिन जाधव, एकनाथ डोंगरे, भाऊसाहेब आनंदकर, प्रफुल्ल गहिले, संतोष कापसे, नवनाथ फलके, लहानू निमसे, विठ्ठल जाधव, संदिप डोंगरे, दिपक चारुडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल शिंदे, गायकवाड मॅडम, उद्योजक रामदास डोंगरे, पिनू जाधव, प्रमोद जाधव, सुरेश जाधव, अंबादास निकम, गोरख फलके, ऋषीकेश ठोकळ आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीने शेतकर्‍यांनी मारुती, नवनाथ व बिरोबा मंदिर येथे बैलांना दर्शनास आनल्याने सजवलेल्या बैलांची जणू जत्राच भरली होती.


पै.नाना डोंगरे म्हणाले की, पोळा म्हणजे वर्षभर शेतकर्‍यांषाठी राबणार्‍या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. मोठ्या आस्थेने गृहीणी बैलांची पूजा करतात. शेतात आधुनिक तंत्रज्ञान आले, तरीही मात्र ग्रामीण भागात या दिवसाला मोठे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *