• Tue. Jun 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

बाबुर्डी घुमटला बैलपोळा उत्साहात साजरा

ByMirror

Aug 27, 2022

साहेबराव परभाणे यांची बैल जोडी ठरली सर्वोत्कृष्ट

ग्रामपंचायतच्या वतीने पारितोषिक प्रदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- बाबुर्डी घुमट (ता. नगर) गावात बैलपोळा उत्साहात साजरा झाला. दोन वर्षापासून कोरोनामुळे खंड पडल्यानंतर यावर्षी शेतकर्‍यांनी बैलांना आकर्षक सजवून गावातून ढोल, ताश्यांच्या गजरात गुलालाची उधळण करीत मिरवणुक काढली होती. यामध्ये सर्वोत्कृष्ट बैल जोडीचे मानकरी साहेबराव (आप्पा) परभणे ठरले.


सर्वोत्कृष्ट बैल जोडी ठरलेल्या परभाणे यांना ग्रामपंचायतच्या वतीने स्मृतीचिन्ह तर उपसरपंच तानाजी परभणे यांनी 11 हजार रुपयाचे वैयक्तिक बक्षिस सरपंच नमिता पंचमुख यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


साहेबराव परभाणे यांनी आपल्या बैल जोडीला आकर्षक सजवून ढोल-ताश्याच्या गजरात गावातून मिरवणुक काढली होती. या आकर्षक बैल जोडीने सर्वांचे लक्ष वेधले. उपसरपंच तानाजी परभणे म्हणाले की, वर्षभर शेतात राबवाणार्‍या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. वर्षातून एकदा सजणार्‍या बैलांचा सन्मान होण्यासाठी सर्वोत्कृष्ट बैल जोडीला पुरस्कार देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. बैल जोडीला सर्वोत्कृष्ट मान मिळाल्याबद्दल गंगाधर कोतकर, भाऊसाहेब लांडगे, बबन फसले, सुभाष परभाणे, शरद भगत, अंकुश परभाणे, भाऊसाहेब चव्हाण, बाबासाहेब परभणे, सोनू गुंजाळ, पवन लांडगे यांनी परभणे यांचे अभिनंदन केले.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *