• Wed. Jun 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

जे.एस.एस. गुरुकुल स्कूलमध्ये बैलपोळा सण उत्साहात साजरा

ByMirror

Aug 26, 2022

शेतकरीच्या वेशभुषेत धोतर, बंडी घालुन मुले तर काटपदरच्या नऊवारी साडीत मुलींची उपस्थिती

शहरातील विद्यार्थ्यांनी अनुभवला बैलपोळा सणाचा प्रत्यक्ष अनुभव

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या कृषीप्रधान संस्कृतीत महत्त्वाचा समजला जाणारा बैलपोळा सणाची माहिती शहरातील शालेय विद्यार्थ्यांना होण्यासाठी केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुल स्कूलमध्ये बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सण साजरा करण्यासाठी शेतकरी वर्गाच्या वेशभुषत धोतर, बंडी, पंचा व डोक्यावर पांढरी टोपीमध्ये मुले तर काटपदरच्या नऊवारी साडीत आलेल्या मुलींनी सर्वांचे लक्ष वेधले.


शहरी भागातील विद्यार्थ्यांना बैलपोळा सण हा केवळ काल्पनिक स्वरुपात माहित आहे. त्याचे महत्व याबाबत अनेक विद्यार्थी अनभिज्ञ असतात हे ओळखून शाळेने हा उपक्रम राबविला. फक्त सोशल मिडीयात शेतकरीचा बैलपोळा सण पाहणार्‍या शहरातील विद्यार्थ्यांना या सणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.

प्राचार्य आनंद कटरीया यांनी शाळेत बैल आणून त्याला विद्यार्थ्यांसमोर शालेय शिक्षकांनी रंग देऊन, फुग्यांची सजावट करुन व घुंगरमाळ घालून सजविले. विद्यार्थ्यांनी बैलला पुरणपोळीचा नैवेद्य दिला. शेतात वर्षभर राबणार्‍या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करुन, विद्यार्थ्यांना बैल पोळ्याचे महत्त्व सांगण्यात आले. प्राथमिकच्या मुलांसाठी शाळेचे कलाशिक्षक कुलांगे सर यांनी माती पासून बैल बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. या उपक्रमासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *