• Wed. Feb 5th, 2025

निमगाव वाघात पाडव्यापासून दहा दिवस रंगणार हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा

ByMirror

Mar 31, 2022

पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवनाथ मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे प्रारंभ शनिवार दि.2 एप्रिल रोजी पाडव्याच्या दिवशी होणार आहे. दि.2 ते 11 एप्रिल या दहा दिवस चालणार्‍या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन निमगाव वाघा ग्रामस्थ, भजनी मंडळ, नवनाथ सोहळा समिती व अ.भा.वारकरी मंडळाने केले आहे.
वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठलबाबा देशमुख (आळंदी) व वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज भोंदे (पिंपळगाव माळवी) यांच्या आशिर्वादाने तर रामायणाचार्य ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे (आळंदी), ह.भ.प. विठ्ठल महाराज खळदकर (निमगाव वाघा), ह.भ.प. जयसिंग महाराज मडके (सोने सांगवी) यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा रंगणार आहे.
दहा दिवस चालणार्‍या या धार्मिक कार्यक्रमात ह.भ.प. विठ्ठल महाराज खळदकर (निमगाव वाघा), ह.भ.प. रामचंद्र महाराज दरेकर (श्रीगोंदा), ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज भवर (आष्टी), ह.भ.प. बाळकृष्ण महाराज दळवी (पारगाव, श्रीगोंदा), ह.भ.प. जालिंदर महाराज नरवडे (टाकळीखातगाव), ह.भ.प. दत्तात्रय महाराज (केडगाव), ह.भ.प. अक्षय महाराज उगले (श्रीगोंदा) यांचे किर्तन होणार आहे. रविवार दि.10 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत ह.भ.प. जयसिंग महाराज मडके (सोने सांगवी) हे राम जन्माचे किर्तन करणार आहेत. तर संध्याकाळी ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज कुर्‍हाडे (आळंदी देवाची) यांचे किर्तन होणार आहे. सोमवारी 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वा. ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे (आळंदी) यांचे काल्याचे किर्तन होवून, महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचे पस्तीसावे वर्ष आहे. दररोज पहाटे काकडा भजन व सकाळी ज्ञानेश्‍वरी पारायण तर संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत हरिपाठ होणार आहे. रात्री 9 ते 11 वा. किर्तनाचा कार्यक्रम रंगणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *