• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

नागरिकांच्या मानसिक व निरोगी आरोग्यासाठी उद्याने उभारण्याची मागणी

ByMirror

Oct 13, 2022

सामाजिक कार्यकर्त्या कमलताई गिरी यांचे वनमंत्री मुनगंटीवार यांना निवेदन

स्पर्धामय जीवन आणि वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांच्या मानसिक व निरोगी आरोग्यासाठी ग्रामीण तथा शहरी भागात शासनाच्या ओसाड पडिक जागेवर उद्याने उभारण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या कमलताई गिरी यांनी सांस्कृतिक व वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.


मुंबई मंत्रालयात गिरी यांनी मुनगंटीवार यांची भेट घेऊन या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. स्पर्धामय व धकाधकीचे जीवन आणि वाढत चाललेल्या प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या मनुष्य विविध शारीरिक आजारांच्या व्याधींनी ग्रासला आहे. भावी पिढीचे आरोग्य धोक्यात येत आहे. शारीरिक आणि मानसिक आजारांचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे. हा धोका टाळण्यासाठी नागरिकांना मोकळा श्‍वास घेण्याची अत्यंत गरज आहे. हे फक्त निसर्गाच्या सानिध्यात शक्य होणार असून, यासाठी उद्याने हा सर्वोत्तम पर्याय आहे. आरोग्य, वीरंगुळा व मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून पुढील पिढीच्या सुदृढ आरोग्यासाठी उद्याने आवश्यक असल्याचे निवेदनात त्यांनी म्हंटले आहे.

ग्रामीण व शहरी भागात सरकारी, निमसरकारी ओसाड पडलेल्या व घाणीचे साम्राज्य पसरवणार्‍या जागा आहेत. तिथे त्वरित उद्याने उभी करण्यासाठी निर्देश देण्याची मागणी सांस्कृतिक व वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

ग्रामीण तथा शहरी भागात शासनाच्या ओसाड पडिक जागेवर उद्याने उभारण्यासाठी मागील पाच वर्षापासून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. शहरी भागातील ओपन स्पेस व अ‍ॅमिनिटी जागेत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उद्याने विकसीत करणे बंधनकारक आहे. मात्र बांधकाम व्यावसायिक त्या जागेचा ताबा घेऊन पुन्हा इमारती उभारण्याचा गैरप्रकार करत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. या ओपन स्पेस व अ‍ॅमिनिटी जागेत उद्याने विकसीत होण्यासाठी शासनाने कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे. -कमलताई गिरी (सामाजिक कार्यकर्त्या)

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *