नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ व अस्तित्व सोशल फाउंडेशनच्या वतीने गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विकास नारायण जगधने यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ व अस्तित्व सोशल फाउंडेशनच्या वतीने नुकताच सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
नाशिकच्या कालिदास कलामंदिर मध्ये योग व सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नगरचे जगधने यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना कामगार नेते संतोष जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे, योग पंडित डॉ. पूनम बिरारी, बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर, सुवर्णा कोठावदे, उद्योजिका शबनम खान आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते विकास जगधने दुर्बल घटकातील लोकांना आधार देऊन त्यांना प्रवाहात आनण्यासाठी नाथ संप्रदाय चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक वर्षापासून कार्य करत आहे. ट्रस्टचे ते अध्यक्ष असून, वंचित घटकांचे प्रलंबीत प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्याचे कार्य सातत्याने करत आहे. स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, रक्तदान व वृक्षरोपण आदी विविध सामाजिक उपक्रमात ते अग्रेसर असतात. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल राकेश उमाप, शाहु कांबळे, सचिन गडावर, महेश बारगजे, किरण गोरे, आकाश नन्नवरे, रमेश शिंदे, म्हस्के गोपीनाथ, शेखर बोत्रे यांनी जगधने यांचे अभिनंदन केले.