लंगर सेवेने गुरुनानक देवजी यांचे विचार आपल्या कार्यातून आचरणात आनले – आ.संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात कोरोनाच्या संकटकाळापासून अविरतपणे भुकेल्यांना जेवण पुरविणार्या व गरजू घटकांना विविध प्रकारची मदत उपलब्ध करुन आधार दिल्याबद्दल गुरु अर्जन देव समाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेला गुरुनानक समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
गोविंदपुरा येथील गुरुद्वारा भाई दयासिंगजी गोविंदपुरा येथे गुरुनानक देवजी यांच्या 553 व्या जयंतीनिमित्त स्व.बिशनदास व राजकुमारी पंजाबी यांच्या स्मरणार्थ पंजाबी परिवाराच्या वतीने हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ.एस.एस. दीपक, नगरसेवक योगीराज गाडे, दिलीप सातपुते, अजिंक्य बोरकर, लकी वाही, प्रदिप पंजाबी, अजय पंजाबी, विजय पंजाबी यांच्या हस्ते लंगर सेवेच्या सेवादारांचा सन्मान करुन त्यांना पुरस्कार देण्यात आले. लंगर सेवेचे हरजीतसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, सतीश गंभीर, राजेंद्र कंत्रोड, मनोज मदान, करण धुप्प्ड, कैलाश नवलानी, सुनील थोरात, दलजीतसिंह वधवा, जय रंगलानी, अनिश आहुजा, सुनील थोरात, प्रशांत मूनोत, सागर पंजाबी, मोहित पंजाबी, सतिंदरसिंग नारंग, जी.एस. वीरदी, किशोर कंत्रोड, राजेंद्र चावला, सावन छाब्रा, सनी आहुजा, संजय सपकाळ, दामोदर बठेजा, कबीर धुप्पड, कैलाश ललवाणी, राजू जग्गी, सनी वधवा, दामोदर माखीजा, गुलशन कंत्रोड, जस्मीतसिंह वधवा आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, लंगर सेवेच्या कार्याची देश पातळीवर दखल घेण्यात आली आहे. कोरोना काळात त्यांनी दिलेले योगदान देवदूताप्रमाणे असून, त्याचा सर्व घटकांना आधार मिळाला. गुरुनानक देवजी यांचे विचार त्यांनी आपल्या कार्यातून आचरणात आनले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदिप पंजाबी यांनी घर घर लंगर सेवेने आपल्या सामाजिक कार्याने शीख, पंजाबी समाजाचे नाव उंचावले. त्यांनी दिलेली सेवा कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले. प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम या पुरस्कारचे स्वरुप आहे.