• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

आम आदमी पार्टीचे स्वच्छता अभियान

ByMirror

Dec 14, 2022

हातात झाडू घेऊन उतरले सावेडी जॉगिंग पार्कच्या स्वच्छतेसाठी

सार्वजनिक स्वच्छतेबरोबर समाजातील भ्रष्टाचाराची स्वच्छता होण्यासाठी पक्ष प्रयत्नशील -प्रा. अशोक डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीच्या वतीने सावेडी येथील जॉगिंग पार्क मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. निरोगी आरोग्य व आरोग्यदायी वातावरणासाठी नागरिकांना सार्वजनिक स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले. तर स्वच्छ व निरोगी भारत घडविण्याचा संदेश देण्यात आला.


सकाळी जॉगिंग पार्कच्या मैदानावर जमलेल्या आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेऊन मैदान परिसराची स्वच्छता करण्यास सुरुवात केली. काही तासातच हा परिसर स्वच्छ करुन मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर कचर्‍याचे संकलन करुन परिसर स्वच्छ करण्यात आला.

या अभियानात संघटन मंत्री प्रा. अशोक डोंगरे, दिलीप घुले, आम आदमी पार्टीचे शहर कार्याध्यक्ष भरत खाकाळ, शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले, सचिव संपत मोरे, दिलीप घुले, गणेश मारवाडे, विक्रम क्षीरसागर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


प्रा. अशोक डोंगरे म्हणाले की, परिसर स्वच्छ असल्यास रोगराई न पसरता नागरिकांचे आरोग्य निरोगी राहणार आहे. निरोगी भारत घडविण्यासाठी स्वच्छता आवश्यक असून, याची सुरुवात स्वत:पासून होणे गरजेचे आहे. घराप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास स्वच्छ भारताचे स्वप्न साकार होणार आहे. सार्वजनिक स्वच्छतेबरोबर पक्षाच्या माध्यमातून समाजातील भ्रष्टाचाराची देखील स्वच्छता होण्यासाठी सर्व पदाधिकारी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


भरत खाकाळ म्हणाले की, प्रत्येकाचे जीवन आरोग्यमयी होण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची ठरत आहे. अस्वच्छता विविध रोगांना निमंत्रण देत असते. नागरिकांनी जागरुक परिसर स्वच्छ ठेवल्यास निरोगी व आनंदी जीवन जगता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील नागरिकांनी आम आदमी पार्टीने राबविलेल्या स्वच्छता अभियानाचे कौतुक केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *