अहमदनगर (प्रतिनिधी)- तिफन फाउंडेशन, कृषी सहाय्यक परिवार व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्सच्या वतीने पत्रकार अरुण भाऊसाहेब वाघमोडे यांना राज्यस्तरीय आदर्श कृषी मित्र पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.
फाउंडेशनच्या वतीने सोमवारी नगरमध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. वाघमोडे यांनी शेतकरी, शेतीशी निगडित विषय, बीज प्रक्रिया उपक्रम तसेच अन्य विषयांवर अभ्यासपूर्ण वार्तंकन करून हे विषय वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडून समाज जागृतीचे कार्य केले. तसेच शेतकर्यांसाठी राज्यस्तरावर राबविण्यात आलेल्या बीज प्रक्रिया या उपक्रमाबाबत आपण केलेल्या बातम्या उल्लेखनीय आहेत. म्हणूनच आम्ही तिफन फाउंडेशनकडून आपणास राज्यस्तरीय आदर्श कृषी मित्र पत्रकारिता पुरस्कार जाहीर करत आसल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुखदेव जमधडे, सह संस्थापक प्रदीप भोर, राज्य समन्वयक अनंत देशमुख व आरसीएफ कंपनीच्यावतीने सांगण्यात आले आहे.
