निमगाव वाघा येथील तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार गौरव
नगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संदीप रासकर यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे होणाऱ्या तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात पाहुण्यांच्या हस्ते रासकर यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.
संदीप रासकर श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक आहे. त्यांनी जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे काम केले आहे. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात नाव चमकवित आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागण्यासाठी त्यांनी आनंदी शाळा उपक्रम राबविला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रासकर हे कवी, वात्रटिकाकार आहेत. शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
