• Sat. Jul 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

एमआयडीसीत युवा सेनेचे लाडू वाटून जल्लोष

ByMirror

Nov 24, 2024
एमआयडीसीत युवा सेनेचे लाडू वाटून जल्लोष

आ. जगताप निवडून आल्याबद्दल केला आनंदोत्सव साजरा

नागरिकांना विकासाच्या मुद्दयाला बहुमत दिले -योगेश गलांडे

नगर (प्रतिनिधी)- नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप मताधिक्याने निवडून आल्याबद्दल एमआयडीसीमध्ये युवा सेनेच्या वतीने लाडू वाटून जल्लोष करण्यात आला. सर्व कामगार व उद्योजकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव साजरा केला.


यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, जिल्हा प्रमुख आकाश कातोरे, भाजपचे किशोर वाकळे, नरेश शेळके, उद्योजक वैभव शेटीया, केशव नागरगोजे, अमित बारवकर, हर्षवर्धन देशपांडे, शंकर शेळके, दत्ता जायभाय, अस्लम इनामदार, महेश गावडे आदींसह उद्योजक व कामगार उपस्थित होते.


योगेश गलांडे म्हणाले की, कल्याणकारी राज्याला जनतेने कौल दिले. महाराष्ट्रात बहुमताने महायुती सरकार सत्तेत आले आहे. कोणती शिवसेना खरी आणि खोटी यावर शिक्कामोर्तब जनतेने केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक कल्याणकारी योजना राबवून जनसामान्यांना आधार देण्याचे काम केले. यामुळे जनतेने महायुती सरकारला बहुमत दिले. तर शहरात नागरिकांना विकासाच्या मुद्दयाला बहुमत देऊन आ. जगताप यांना मताधिक्याने विजयी केले. या विजयात सर्वसामान्य नगरकर सहभागी असल्याचे त्यांनी त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *