आयुर्वेदाचा प्रचार प्रसार, बेरोजगार मुक्त भारत व नशामुक्ती अभियानाची दखल घेऊन केला सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- आयुर्वेदाचे प्रचार प्रसार करुन बेरोजगार मुक्त भारत व नशामुक्तीचे अभियान चालविणारे नगर जिल्ह्यातील विष्णू शिवाजी अवचार यांना नॅशनल ॲन्टी हैरेसमेंट फाऊंडेशन ऑर्गनायझेशनच्या वतीने भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भोपाळ येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात एअर कमांडर अख्तर व सिने अभिनेते रमेश गोयल यांच्या हस्ते अवचार यांना पुरस्कार प्रदान करुन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. विष्णू अवचार व सोनाली अवचार यांनी सपत्निक पुरस्कार स्विकारला.

राळेगण थेरपाळ (ता. पारेनर) येथील शेतकरी कुटुंबातून आलेले विष्णू शिवाजी अवचार हे स्वास्थ्य भारत व बेरोजगार मुक्त भारत अभियान चालवित आहे. गेल्या 13 महिन्यांमध्ये त्यांनी दीड हजारपेक्षा जास्त नागरिकांना निरोगी जीवनाचा कानमंत्र देऊन नशामुक्तीसाठी कार्य केले आहे.
पाचशेपेक्षा अधिक सुशिक्षित बेरोजगार युवकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तर काही व्यावसायिक बनवले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.