• Fri. Jul 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

केडगाव एमआयडीसीत वासन टोयोटाचे हायटेक ‘2S’ वर्कशॉप गुरुवारी उद्घाटन

ByMirror

Feb 11, 2026
नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर व नगरसेवकांचा होणार सन्मान

नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर व नगरसेवकांचा होणार सन्मान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट (एमआयडीसी) परिसरात वासन टोयोटाचे नवीन, प्रशस्त आणि अत्याधुनिक ‘2S’ सुविधांनी सुसज्ज असे हायटेक वर्कशॉप सुरू होत असून त्याचे उद्घाटन गुरुवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.00 वाजता होणार आहे. या भव्य उद्घाटन सोहळ्यास आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


वासन टोयोटा परिवाराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर तसेच सर्व नगरसेवकांचा विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती वासन टोयोटाचे विजय वासन व जनक आहुजा यांनी दिली.


नवीन वर्कशॉपमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘2S’ सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ग्राहकांना दर्जेदार आणि जलद सेवा देण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक उपकरणे, प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि विस्तृत सेवा विभागाची उभारणी करण्यात आली आहे. वाहनांची सर्वसमावेशक तपासणी, देखभाल व दुरुस्ती तसेच डेंटिंग, पेंटिंग व अत्याधुनिक वॉश सुविधा एकाच छताखाली करण्याची सुविधा येथे उपलब्ध असणार आहे.


हा कार्यक्रम तरुण वासन यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. केडगाव एमआयडीसी परिसर औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होत असून, या ठिकाणी सुरू होणारे वासन टोयोटाचे नवीन वर्कशॉप वाहनधारकांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही निर्माण होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. उद्घाटन सोहळ्यास शहरातील मान्यवर, उद्योगपती, ग्राहक व नागरिक उपस्थित राहणार आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *