9 वर्षापूर्वी झालेला रस्ता आजही चांगल्या स्थितीत; दर्जेदार रस्ते करण्याची मागणी
मागील वर्षी तर काही महिन्यांपूर्वी झालेले रस्ते नुकतेच झालेल्या दमदार पावसाने वाहून गेल्याचे चित्र नगरकरांच्या डोळ्यापुढे आहे. विकासासाठी कोट्यावधीचा निधी आणला जात असला तरी त्या निधीचे योग्य नियोजन आणि दर्जेदार कामासाठी वापर होणे आवश्यक आहे. 2015 साली माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या निधीतून गुलमोहर रोड येथील अर्बन बँक कॉलनीचा रस्ता करण्यात आला.
यासाठी स्वत: लक्ष देऊन सिमेंट काँक्रिटीचा दर्जेदार रस्ता करुन घेण्यात आला होता. आजही या रस्त्याची परिस्थिती अत्यंत चांगली असून, 9 वर्षात एक खड्डा देखील सदर रस्त्याला पडलेला नाही. चांगले दर्जेदार रस्ते केल्यास ते मोठ्या कालावधी पर्यंत टिकतात. मात्र निकृष्ट दर्जाचे कामे होत असल्याने सर्वच रस्ते पावसानंतर खड्डेमय बनत चालले आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये देखील या रस्त्याचे उत्कृष्ट काम झाल्याचे समाधान असून, या रस्त्याच्या धर्तीवर शहरातील इतर रस्त्यांचे कामे होण्याची मागणीही नागरिकांमधून होत आहे. महापालिका आयुक्तांनी सदर रस्त्याची पहाणी करुन शहरातील होणारे रस्ते या मॉडेल रस्त्याप्रमाणे करण्याचे वाखुरे यांनी म्हंटले आहे.