• Sat. Feb 8th, 2025

एमआयडीसीमध्ये इंडियन व्हॅल्यू इंजिनिअरिंग सोसायटीच्या नगर चॅप्टरचे उद्घाटन

ByMirror

Nov 6, 2024

अभियांत्रिकी, उत्पादन, बांधकाम, उद्योग, रुग्णालये आणि अनेक उद्योगांना चालना देण्याचा उपक्रम

नगर (प्रतिनिधी)- येथील एमआयडीसी, एमसीसीआयए मध्ये इंडियन व्हॅल्यू इंजिनिअरिंग सोसायटी (इनव्हेस्ट) अंतर्गत नगर चॅप्टरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्हॅल्यू इंजिनिअरिंगचा उपयोग अभियांत्रिकी, उत्पादन, बांधकाम, उद्योग, रुग्णालये आणि अनेक उद्योगांमध्ये उपयोगात आणण्यासाठी प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले.


अरविंद पारगावकर हे या चॅप्टरचे चेअरमन (एमेरिटस) असतील आणि लॉरिट्झ नुडसेन (एल ॲण्ड टी) चे लक्ष्मण पुजारी झोनल चेअरमन म्हणून काम करणार आहे. लॉरिट्झ नुडसेनचे प्रसाद लेले आणि सीजी पॉवरचे गौतम सुवर्णपत्की यांनी व्हाईस चेअरमनपद स्विकारले. व्ही डिझाईन आणि टूलिंगचे सनी वधवा हे झोनल सेक्रेटरी म्हणून आणि लॉरिट्झ नुडसेनचे विकास मालकर हे सहसचिव म्हणून काम पाहणार आहे. लॉरिट्झ नुडसेन कडून केतन देशपांडे विभागीय कोषाध्यक्ष म्हणून, तर इंडिया व्हॅल्यू इंजिनिअरिंग सोसायटीचे सतींदर सिंग अहलुवालिया आणि राजन नागरे मार्गदर्शन करणार आहेत. सीजी पॉवर कडून संदीप बचकर, जीकेएनचे सुनील राठी आणि किर्लोसकरचे शंकर खाटेकर कौन्सिल सदस्य राहणार आहे.


इंडियन व्हॅल्यू इंजिनिअरिंग सोसायटी (इनव्हेस्ट) चे अध्यक्ष अमित कुमार यांनी वर्चुअल पध्दतीने कार्यक्रमात सहभाग नोंदवून अध्याय निर्मितीसाठी शुभेच्छा दिल्या. केएसबी, लॉरिट्झ नुडसेन, सीजी पॉवर, पॉलीमिक्ट, क्लग पंप, व्हिसाग्रल इंडस्ट्री, केसीपीजी, जीकेएन आणि एमआयडीसी मधील कंपन्यांचे अभियंते व्हॅल्यू इंजिनिअरिंग या चर्चासत्रात सहभागी झाले होते.


व्हॅल्यू इंजिनिअरिंग ही एक संकल्पना असून, जी आवश्‍यक कार्ये शक्य तितक्या कमी खर्चात कव्हर करण्याच्या दृष्टिकोनाचा अवलंब करण्यावर लक्ष केंद्रित करते. ही संकल्पना कार्यप्रदर्शन किंवा कार्यक्षमतेशी तडजोड न करता साहित्य बदलण्यावर आणि कमी खर्चिक पर्याय निवडण्यावर भर देते. भौतिक गुणधर्मांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, प्राथमिक लक्ष सामग्री आणि घटकांची कार्ये ऑप्टिमाइझ करण्यावर आहे. मूल्य अभियांत्रिकी उत्पादन, बांधकाम, उद्योग, रुग्णालये आणि अनेक उद्योगांमध्ये लागू असल्याचे चर्चासत्रात स्पष्ट करण्यात आले.


या चर्चासत्रात मोठ्या संख्येने अभियंते सहभागी झाले होते. सतींदरसिंग अहलुवालिया यांनी व्हॅल्यू इंजिनीअरिंगची थोडक्यात ओळख करून दिली. अरविंद पारगावकर व लक्ष्मण पुजारी यांनी व्हॅल्यू इंजिनिअरिंगचे महत्त्व विशद करुन व्यक्त केली. प्रसाद लेले यांनी व्हॅल्यू इंजिनिअरिंगचा प्रवास आणि अनुभव सांगितला. सनी वधवा कार्यक्रमाचे मास्टर ऑफ सेरेमनी होते. या चॅप्टरद्वारे भविष्यात सेमिनार, प्रशिक्षण आदी प्रकल्प आयोजित केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *