शितल भंडारी, सागर सदगीर, प्रिया गुळवे, स्वराज बेरड, शिवराज बेरड, साक्षी भंडारी, ज्ञानेश्वर भालसिंग, खुशी हसे ठरले अव्वल
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व ट्रँक रेसर्स स्पोर्टसच्या वतीने वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये शितल भंडारी, सागर सदगीर, प्रिया गुळवे, स्वराज बेरड, शिवराज बेरड, साक्षी भंडारी, ज्ञानेश्वर भालसिंग, खुशी हसे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. सुनील जाधव व राजेंद्र कोतकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश भालेराव उपस्थित होते. ही स्पर्धा मुले-मुली 10 कि.मी., मुलांमध्ये 20 वर्ष वयोगट 8 कि.मी., 18 वर्ष वयोगट 6 कि.मी. 16 वर्ष वयोगट 2 कि.मी., मुलींमध्ये 20 वर्ष वयोगट 6 कि.मी., 18 वर्ष वयोगट 4 कि.मी., 16 वर्ष वयोगट 2 कि.मी. गटात पार पडली. स्पर्धेसाठी दिनेश भालेराव, श्रीराम सेतू आवारी, अमित चव्हाण, गुलजार शेख, विश्वेशा मिस्कीन, समीर शेख, अनिकेत कोळगे, प्रशांत कोळगे, ओंकार दहिफळे, रोहन पिसे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
या स्पर्धेतून विजयी खेळाडूंची अहमदनगर जिल्ह्याच्या संघात निवड करण्यात आली आहे. हा संघ 17 डिसेंबर रोजी बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:- 16 वर्षे मुली प्रथम- प्रिया गुळवे, द्वितीय- तनुजा आतकर, तृतीय- सृष्टी शर्मा, मुले प्रथम- शिवराज बेरड, द्वितीय- महादेव खेडकर, तृतीय- सार्थक आजबे,
18 वर्षे मुले प्रथम- स्वराज बेरड, द्वितीय- राहुल खेडकर, तृतीय- कृष्णा गायके, मुली प्रथम- साक्षी भंडारी, द्वितीय- आरती कोलते, तृतीय- राणीगिरी,
20 वर्षे मुले प्रथम- ज्ञानेश्वर भालसिंग, द्वितीय- नवनाथ भास्कर, तृतीय- योगेश निमसे, चतुर्थ- विजय फुलमाली, पाचवा- विशाल फुलडहाळे, सहावा- वेदांत पानसरे, मुली प्रथम- खुशी हसे, द्वितीय- संयुक्ता गारडे, तृतीय- राजनंदिनी,
महिला प्रथम- शितल भंडारी, द्वितीय- भाग्यश्री भंडारी, तृतीय- विशाखा भास्कर, चतुर्थ- पूनम वलवे, पुरुष प्रथम- सागर सदगीर, द्वितीय- प्रसाद गव्हाणे, तृतीय- किशोर मरकड, चतुर्थ- विक्रम बोरुडे, पाचवा- रामदास लोखंडे, सहावा- प्रतीक मोरे.
