विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास (नाशिक) आयोजित स्पर्धेत पटकाविली पदके
अहमदनगर (प्रतिनिधी)- डिस्ट्रीक्ट प्रोबेशन ॲण्ड आफ्टर केअर असोसिएशन संस्था संचलित अहमदनगर मुला-मुलींचे निरीक्षण गृह व बालगृहातील विद्यार्थ्यांनी विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास (नाशिक) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेत यश संपादन केले. क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन विविध खेळाचे सांघिक व वैयक्तिक बक्षिसे विद्यार्थ्यांनी पटकाविली.
चाचा नेहरू बाल महोत्सव स्पर्धा स्व.मीनाताई ठाकरे संकुल (नाशिक) येथे पार पडली. क्रिकेटमध्ये मुलांच्या संघाने प्रथम तर कबड्डी या स्पर्धेत मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. 400 मीटर रिले मध्ये विजय झोरे, योगेश जोंधळे, सखाराम कसाळ व संदेश लवांडे या मुलांनी तृतीय क्रमांक, 100 मीटर धावणे या खेळात अनिता जाधव हिने तृतीय क्रमांक, तर गोळाफेक या खेळात राधा माळीने हिने द्वितीय क्रमांक मिळवला. नृत्य स्पर्धेत योगेश जोंधळे यांनी प्रथम क्रमांक, निबंध स्पर्धेत श्रावणी पालवे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. हस्ताक्षर स्पर्धेत कृष्णा काळे, राजवीर शेटे, विशाल गायकवाड यांनी पारितोषिक मिळवली.
या सर्व मुला-मुलींना संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अच्युत चौधरी, मानद सचिव ॲड. गोविंदराव मिरीकर, ॲड. जयवंत भापकर, डॉ. शकील फातिमा शेख, खजिनदार ॲड. विश्वास आठरे, संस्थेच्या अधीक्षिका पौर्णिमा माने, संस्थेच्या शिक्षिका सुलोचना काळापहाड यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या मुलांना स्पर्धेसाठी संस्थेचे कर्मचारी गणेश कबाडे, नदीम शेख, रेखा जाधव, सचिन जाधव, संगीता शेळके यांचे सहकार्य लाभले.