18 खेळाडूंनी पटकाविले सुवर्ण, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड
नगर (प्रतिनिधी)- तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अहिल्यानगर व एकलव्य तायक्वांदो ॲकॅडमी अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅडेट व ज्युनिअर मुले व मुलींच्या शहर जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा गुरुवारी (दि. 7 मे) रोजी प्रियदर्शनी पब्लिक स्कूल भिंगार या ठिकाणी घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये एकलव्य तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत 18 सुवर्ण, 10 रौप्य व 4 कांस्यपदकांची कमाई केली. सुवर्णपदक विजेते खेळाडूंची नाशिक येथे 11 ते 13 मे रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व खेळाडूंना ग्रँडमास्टर अल्ताफ खान, मुख्य प्रशिक्षक गणेश वंजारे, योगेश बिचीतकर, सचिन मरकड, मंगेश आहेर, सचिन कोतकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व खेळाडूंचे एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष दिलीप सातपुते, स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, उपाध्यक्ष संतोष लांडे, राज्य उपाध्यक्ष व शहर सचिव घन:श्याम सानप यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. बक्षीस वितरण प्रसंगी धर्मनाथ घोरपडे, नारायण कराळे, राष्ट्रीय पंच शर्मिला शेख उपस्थित होते. यश प्राप्त करणाऱ्या खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.