खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड; स्केटिंग, शूटिंग व आर्चरी स्पर्धेत पटकाविले बक्षीसे
नगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आंतर शालेय स्केटिंग व शूटिंग स्पर्धेमध्ये आर्मी पब्लिक स्कूल (एमआयसी ॲण्ड एस) च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
शूटिंग स्पर्धेत गुंजन कुमारी (17 वर्षे वयोगट) व अर्णव वाघ (14 वर्षे वयोगट) याने प्रथम क्रमांक पटकाविला. स्केटिंग स्पर्धेत राजवीर जगताप (11 वर्ष वयोगट) याने प्रथम तर ईशानी चौहान(14 वर्षे वयोगट) तृतीय क्रमांक मिळवला. तर तिरंदाजी स्पर्धेत जिविशा अग्रवाल (14 वर्षे वयोगट) हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केले.
विजेत्या खेळाडूंचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका एकता सिंह व उपमुख्याध्यापिका हर्षा चौहान यांनी सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रमोद डोंगरे व मनीष सिंह यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंचे ज्युनियर विंगच्या मुख्याध्यापिका सस्वतीका पुरोहित व सर्व शालेय शिक्षकांनी अभिनंदन केले.
