• Wed. Oct 15th, 2025

12, 14 मुले आणि 17 वर्षा आतील मुलींमध्ये विजय मिळवून श्री साई स्कूलची आघाडी

ByMirror

Sep 9, 2025

ऊर्जा गुरुकुल विरुध्द श्री साई स्कूलचा बरोबरीत सुटलेला सामना ठरला लक्षवेधी


फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत सोमवारी (दि.8 सप्टेंबर) 12, 14 मुले आणि 17 वर्षा आतील मुलींमध्ये श्री साई स्कूलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन विजय मिळवला. तर 12 वर्ष वयोगटात तक्षिला, 16 वर्ष वयोगटात ज्ञानसंपदा स्कूलने देखील विजय संपादन केले. 16 वर्ष वयोगटातील ऊर्जा गुरुकुल विरुध्द श्री साई स्कूल मधील बरोबरीत सुटलेला सामना अत्यंत रोमांचक राहिला. 14 वर्ष वयोगटातील सामन्यात श्री साई स्कूलच्या आरुष भावे याने गोलची हॅट्रीक केली.


सकाळच्या सत्रात 12 वर्ष वयोगटात (मुले) तक्षिला स्कूल विरुध्द ज्ञानसंपदा स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात तक्षिला स्कूलने 2-0 गोलने विजय मिळवला. यामध्ये तक्षिला संघाकडून सिध्दार्थ प्रजापती व अभिनव मोरे यांनी प्रत्येकी 1 गोल केले.
16 वर्ष वयोगटात (मुले) ज्ञानसंपदा स्कूल विरुध्द अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात ज्ञानसंपदा स्कूलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन 6-0 गोलने एकहाती विजय मिळवला. प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही. यामध्ये ज्ञानसंपदाचे खेळाडू मोक्ष गरदास, कृष्णा भिसे, शुभम सानप, सिध्देश पवार, हर्षवर्धन साठे, श्रेयस पालवे यांनी प्रत्येकी 1 गोल केला.


17 वर्षा आतील मुलींमध्ये ऊर्जा गुरुकुल विरुध्द श्री साई स्कूलमध्ये अटातटीचा सामना रंगला होता. यामध्ये निकिता रामावत हिने 1 गोल करुन श्री साई स्कूलला 0-1 गोलने विजय मिळवून दिला.


दुपारच्या सत्रात 12 वर्ष वयोगटात (मुले) ऊर्जा गुरुकुल विरुध्द श्री साई स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात ऊर्जा गुरुकुलने 2-0 गोलने विजय मिळवला. यामध्ये लव्य पटेल व समर्थ महीन यांनी प्रत्येकी 1 गोल केला.


16 वर्ष वयोगटात (मुले) ऊर्जा गुरुकुल विरुध्द श्री साई स्कूल मधील सामना अत्यंत रोमांचक राहिला. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना रंगला होता. ऊर्जा गुरुकुल कडून स्वराज आडेप व श्री साई स्कूलकडून दिग्वीजय पुरीबुवा यांनी प्रत्येकी 1 गोल करुन सामना बरोबरीत ठेवला. दोन्ही संघट आघाडी घेण्यासाठी शेवट पर्यंत झुंजले.1-1 गोलने हा सामना बरोबरीत सुटला.


14 वर्ष वयोगटात (मुले) नालंदा स्कूल विरुध्द श्री साई स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात 0-4 गोलने श्री साई स्कूलने विजय मिळवला. यामध्ये आरुष भावे याने 3 व सुवंश पूजारी याने 1 गोल करुन आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *