• Mon. Jul 21st, 2025

अहमदनगर हायस्कूलमध्ये क्रीडा सप्ताह उत्साहात पार

ByMirror

Dec 23, 2023

विविध क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर हायस्कूलमध्ये क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडले. क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन यतीमखाना संस्थेचे विश्‍वस्त हाजी निजाम बागवान, संचालक उबेद शेख आणि नूर मोहंमद पठाण यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सय्यद शाहीदा आदींसह विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रारंभी आकाशात फुगे सोडून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेत विविध क्रीडा स्पर्धा रंगल्या होत्या. उबेद शेख म्हणाले की, खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो. जिद्द आणि चिकाटीने जीवनात यश गाठता येते. आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी खेळातूनही करियर घडविता येऊ शकत असल्याचे त्यांनी सांगितले.


नूर मोहंमद पठाण यांनी खेळाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे निजाम बागवान यांनी विद्यार्थ्यांना खेळासाठी सर्वतोपरी संस्थेकडून मदत केली जाणार असल्याचे आश्‍वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा कुलकर्णी यांनी केले. आभार प्राचार्य सय्यद शाहीदा यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *