युवान आणि एनवायपीचे राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक शिबिरातील उपक्रम
एम.आय.सी.एस. मध्ये कार्यक्रमाला दोन हजार सैनिक कुटुंबाची उपस्थिती
नगर (प्रतिनिधी)- भारतातील विविध राज्यातून आलेल्या युवक युवतींच्या संघांनी सादर केलेल्या सांस्कृतिक व पारंपारिक कार्यक्रमातून उपस्थित लष्करी सैनिक व त्यांचे कुटुंबीय भारावले. युवान आणि राष्ट्रीय युवा योजनेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक शिबिरातंर्गत एम.आय.सी.एस. मध्ये आयोजित एक दिवस आपल्या सैनिकांसाठी कार्यक्रम पार पडला. यामध्ये विविध प्रांतातील युवक-युवतींनी देशभक्तीपर कार्यक्रमातून देशातील संस्कृती व लोकनृत्याचे दर्शन घडले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी एम.आय.सी.एस. चे ब्रिगेडियर रसेल डिसोजा, सीक्यूएव्हीचे ब्रिगेडियर राजीव चावला एन.वाय.पी.चे विश्वस्त रणसिंग परमार, के. सुकुमार, मधुसूदन दास, नरेंद्र वडगावकर, युवानचे संस्थापक संदीप कुसळकर, सचिव सुरेश मैड उपस्थित होते.

दीपप्रज्वलन करून व भारत मातेच्या जय घोषात या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी हरियाणा, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, ओरिसा, गोवा, छत्तीसगड सह विविध राज्यातील युवक युवतींनी आपल्या प्रादेशिक नृत्य सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.
ब्रिगेडियर डिसोजा यांनी युवानच्या वतीने आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रथमच सैनिक व त्यांच्या कुटुंबासाठी आपल्या राज्याच्या सांस्कृतिक दर्शन घडवल्याने ते भारावले. राष्ट्रीय एकात्मता वाढवणाऱ्या या कार्यक्रमामुळे राष्ट्रभक्ती व सामाजिक एकता अधिकच घट्ट होईल असा आशावाद व्यक्त केला. युवान चे संदीप कुसळकर यांनी युवानचे कार्य व शिबिराविषयी भूमिका प्रास्ताविकातून स्पष्ट केली. याप्रसंगी युवान व एनवायपीच्या वतीने ब्रिगेडियर रसेल डिसोजा यांचे स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच एम आयसीएस च्या वतीने ब्रिगेडीअर रसेल डिसोजा यांनी युवानचे संस्थापक संदिप कुसळकर यांचा सेनेचे विशिष्ट स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला.
भारत की संतान या भारतातील विविध 18 भाषांचे महत्त्व सांगणाऱ्या कार्यक्रमातून उपस्थित सैनिक भारवले. या कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र वडगावकर व मधुसूदन दास यांनी केले. कार्यक्रम याप्रसंगी सर्व धर्म प्रार्थना मध्ये सर्व उपस्थित सहभागी झाले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.प्राजक्ता भंडारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. ऋचा तांदूळवाडकर, ॲड. शाम असावा, रुपेश पसपूल, करिष्मा काळे, दिपाली पवार, मंगेश गुंजाळ, प्रसन्न बोरा, सुप्रिया मैड यांचे सहकार्य लाभले.