विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्काराने गौरव; देशभक्ती गीत गायन, नृत्य व ‘महाराष्ट्राची लोकधारा’ स्पर्धांचे पारितोषिक वितरण
स्पर्धा प्रगतीचा मार्ग दाखवते; कौशल्य विकासासह आत्मविश्वास निर्माण होतो – पै. डॉ. शबनम शेख
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “स्पर्धा आपल्याला प्रगतीचा मार्ग दाखवते. स्पर्धेमुळे स्वतःमधील कौशल्य सुधारण्याची संधी मिळते. कष्टाची सवय लागते. आपल्या कामाचा दर्जा सुधारतो. स्वयंमूल्यमापन होऊन आत्मविश्वास निर्माण होतो,” असे प्रतिपादन कुस्तीतील आंतरराष्ट्रीय खेळाडू व सुवर्णपदक विजेत्या पै. डॉ. शबनम शेख यांनी केले.
माय भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय, उडाण फाउंडेशन संलग्न जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात स्वच्छता पखवाड्यानिमित्त देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा तसेच ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना राज्यस्तरीय ‘उडाण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात पै. डॉ. शबनम शेख बोलत होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात तुलसी मातेला पाणी अर्पण करून करण्यात आली. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमास पुणे येथील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. प्रशांत साळुंके, अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे संचालक मेहरनाथ कलचुरी, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, जय असोसिएशन ऑफ एनजीओचे राज्य अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, उडाणच्या अध्यक्षा आरती शिंदे, शासनाचा राज्य आदर्श युवती पुरस्कार विजेत्या जयश्री शिंदे, ॲड. अनिता दिघे, ॲड. दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.
पुढे पै. डॉ. शबनम शेख म्हणाल्या की, पुरस्कारामुळे गुणवत्तेचा सन्मान होतो. केलेल्या कामाची पावती मिळाल्याने आणखी काम करण्यास ऊर्जा मिळते. इतरांनाही चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्तीला स्वतःमधील कौशल्य ओळखून त्यात सुधारणा करण्याची संधी मिळते. स्पर्धेमुळे कष्टाची सवय लागते आणि आपल्या कामाचा दर्जाही सुधारतो. स्वयंमूल्यमापन होऊन आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. मेहरनाथ कलचुरी म्हणाले की, मानवी जीवनाचा आनंद घेताना इतरांना त्रास ठरणार नाही, याचा विचार केला पाहिजे. खेळाडू वृत्तीने पराभव, अपयश पचविता आला पाहिजे. पुन्हा कष्टाने प्रयत्न करून यश मिळवण्याची जिद्द ठेवली पाहिजे तसेच मन शांत ठेवले तर सर्व गोष्टी शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा तसेच ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण गीतकार राजेंद्र टाक व नृत्यविशारद अनंत द्रवीड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. महेश शिंदे यांनी केले. आभार आरती शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार चिंतामणी, अशोक आबनावे, डॉ. ईसाभाई शेख, प्राचार्य संजय पडोळे, संतोष लयचेट्टी, धीरज ससाणे, संध्या जोशी, रामेश्वर राऊत, मेहतानी, मुस्कान, महेक शेख, वनिता पाटील, भारती शिंदे, अक्षय शिंदे, रमेश गाडगे, स्वाती डोमकावळे, निलेश गर्जे, तुषार रणनवरे, अनिल मेजर, भीमराव उल्हारे, ॲड. विद्या शिंदे, जयेश शिंदे, भाऊसाहेब पादीर, कविता अभंग, राम अभंग, ॲड. तुषार शेंडगे, गायत्री गुंड, बाळू बनसोडे, शुभम शिंदे, छाया शिंदे, हर्षल वामन, ऐश्वर्या बनसोडे, प्रतीक्षा वामन, दिलीप शिंदे, फरान खान, अनुराधा शिंदे, मनीषा भिंगारदिवे आदींनी परिश्रम घेतले.
–
राज्यस्तरीय उडाण पुरस्काराने कर्तृत्ववान व्यक्तींचा स्मृतिचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरव.
रूपाली करांडे (महिला सक्षमीकरण), सागर ससाणे (उद्योजकता), अरबाज शेख (योगा), प्राचार्या ज्योत्स्ना शिंदे (शैक्षणिक), प्रमिला गावडे (शैक्षणिक, राहुरी), अशोक भालके (रक्तदान चळवळ, चांदा), प्रा. सुनील मतकर (शैक्षणिक), अनंत जोशी (नाट्यक्षेत्र), अनंत द्रविड (नृत्य क्षेत्र), विद्या तन्वर(कॅन्सर जनजागृती), राजेंद्र टाक (गीत, कथा), राजेश व्यवहारे (लोककला), प्रा.च.वी. जोशी (साहित्य क्षेत्र), सुनील राऊत (साहित्य), विद्या जोशी (नाट्य-कलाक्षेत्र), सागर ख्रिस्ती (नाट्य क्षेत्र), रजनीताई ताठे (महिला समुपदेशन, सामाजिक), रोहिणी थोरात (लोककला), अप्पा साळवी (महिला सक्षमीकरण, पुणे), दत्तात्रय वारकड (कवी), हेलन पाटोळे (आरोग्यसेवा), सविता सकट (आरोग्यसेवा), चंद्रकांत ख्याले (पुणे, सामाजिक), साधना कुकडे (सामाजिक), बाबू काकडे (सामाजिक).

