नगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर, गोविंदपूरा येथील इनाया नदीम शेख या मुलीने अवघ्या सहाव्या वर्षी रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. अत्यंत कमी वया मध्ये रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना तिने उपवास केल्याबद्दल तिचे कौतुक होत आहे.
पहाटे तिने सहेरी करुन भक्तीभावाने नमाज अदा केली आणि संध्याकाळी रोजा इफ्तारीने सोडला. तब्बल तेरा तासांहून अधिक काळ तिने निर्जली रोजा ठेवला होता. इनाया हिने ठेवलेल्या रोजाबद्दल नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी कौतुक करुन अभिनंदन केले. ती हॉली एन्जल या पूर्व प्राथमिक शाळेत युकेजी मध्ये शिकत आहे.