स्टेट बँक चौकातून संध्याकाळी निघणार मिरवणुक; महाआरती, व महाप्रसादाचे आयोजन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार, भुईकोट किल्ला परिसरातील श्री बेलेश्वर महादेव मंदिर येथे सोमवारी (दि. 13 ऑक्टोबर) चांदीचा मुकुट अर्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भगवान शंकराच्या या ऐतिहासिक देवस्थानात पहिल्यांदाच हा सोहळा रंगणार आहे.
या सोहळ्याची सुरुवात सायंकाळी 6 वाजता स्टेट बँक चौकातून निघणाऱ्या भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे. यानंतर रात्री 8 वाजता मंदिरात श्री बेलेश्वर महादेवांना चांदीचा मुकुट अर्पण केला जाणार असून, त्या वेळी विशेष महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व श्रद्धाळू भक्तांना आयोजक मंडळाने उपस्थित राहण्याचे आवाहन या सोहळ्याचे संयोजक लक्ष्मण (आबा) कचरे, संतोष कानडे, गणेश लालबागे, संदीप गुजर यांनी केले आहे. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री बेलेश्वर आरती ग्रुप आणि आदिशक्ती सार्वजनिक मित्र मंडळ प्रयत्नशील आहेत.