• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरात शिक्षक परिषदेच्या सभासद नोंदणी अभियानाला प्रारंभ

ByMirror

Aug 23, 2023

विविध शिक्षक संघटनांच्या वतीने नुतन शहर जिल्हाध्यक्ष बोडखे यांचा सत्कार

शिक्षकांच्या प्रश्‍नांची जाणीव व प्रश्‍न सोडविणे हेच प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून कार्यरत राहणार-बाबासाहेब बोडखे

अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रात संघर्षमय परिस्थितीतून पुढे आल्याने, शिक्षकांच्या प्रश्‍नांची जाणीव आहे. शिक्षकांचे प्रश्‍न सोडविणे हेच प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून संघटनेच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे. शिक्षक परिषद राज्य पातळीवरील सर्वात मोठी शिक्षक संघटना असून, शिक्षकांच्या न्याय, हक्कासाठी सातत्याने संघर्ष करत असल्याचे प्रतिपादन शिक्षक परिषदेचे नवनिर्वाचित शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी केले.


महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शहरात सभासद नोंदणी अभियानाला प्रारंभ करण्यात आले. यावेळी खासगी व सरकारी शाळेतील शिक्षकांची नोंदणी करण्यात आली. यावेळी सुहास करांडे, भाऊसाहेब काळदाते, अंजली भिंगारदिवे, अर्चना लोखंडे, संगिता मोटे, गॅस्पर बनसोडे, गोविंद कांडेकर, विजय पठारे, माया मकासरे, निर्मला पारखे, जोनिता गायकवाड, क्रांती पळघडमल, रामप्यारी जाट, यामिनी आपटे, जया भाटिया, पौर्णिमा सोनवणे, शिल्पा शिंदे, श्‍याम लोंढे, स्नेहल खंत, कांचन धीवर, विशाखा फिलीप, सगुना टाकवाले, गुरुशील सोही, शांती नेरा, रचना गायकवाड, मयुर टेमक आदी उपस्थित होते.


पुढे बोडखे म्हणाले की, स्वतःच्या अस्तित्वासाठी व न्याय मागण्यासाठी प्रत्येकाला संघटनेची गरज भासते. संघटनेतील प्रत्येक सभासदाला न्याय देण्यासाठी संघटना सक्षम आहे. संघटना असल्यास प्रश्‍न सोडविण्यासाठी ताकद उभी राहते. एखाद्यावर अन्याय झाल्यास शिक्षक परिषदेच्या माध्यमातून संघटितपणे न्याय मागण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वेगवेगळ्या शैक्षणिक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी शिक्षकांशी चर्चा करण्यात आली.


या कार्यक्रमात शिक्षक परिषदेच्या शहर जिल्हाध्यक्षपदी बोडखे, कार्यवाहपदी शिवाजी धाडगे, शहर कोषाध्यक्षपदी प्रसाद सामलेटी व नगर ग्रामीण कोषाध्यक्ष बबन शिंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विविध शिक्षक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तौसिफ शेख, राजू पठाण, मुख्याध्यापक जमीर शेख, फारुक सय्यद, अभिजीत गवारे, उरमुडे सर, अंजुम खान, प्राचार्य श्रीकृष्ण पवार, ज्ञानेश्‍वर शिंदे आदी उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *