नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून उभारला कोल्ड प्रेस खाद्य तेलाचा व्यवसाय
पाठीवरती शाबासकीची थाप जीवनात आत्मविश्वास निर्माण करते -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- पुरस्काराने आनखी उत्साहाने कार्य करण्याची ऊर्जा मिळते. पुरस्कारातून पाठीवरती शाबासकीची थाप जीवनात आत्मविश्वास निर्माण करते. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळण्याची गरज आहे. युवा उद्योजक विनोद साळवे यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून व समाजाची गरज ओळखून कोल्ड प्रेस तेलाचा व्यवसाय उभा केला आहे. तर या व्यवसायातून अनेक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी निर्माण करुन दिल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
जय युवा अकॅडमीच्या वतीने युवा उद्योजक विनोद साळवे यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार आमदार जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कोहिनूर मंगल कार्यालय येथे सावित्री ज्योती महोत्सवात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी जय युवाचे अध्यक्ष महेश शिंदे, ॲड. अनिता दिघे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गर्जे, सुभाषराव सोनवणे, शब्दगंध साहित्यिक परिषदचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, ॲड. भूषण बऱ्हाटे, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, संजय पाटील, सिंधू वाणी, पोपट बनकर, रावसाहेब काळे, मेजर शिवाजी वेताळ, तनिज शेख, आरती शिंदे आदी उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना विनोद साळवे म्हणाले की, युवा उद्योजक म्हणून झालेला गौरव हा भविष्यातील जडणघडणीत स्फूर्ती देणारा ठरणार आहे. आई-वडिलांच्या प्रेरणेतून हा व्यवसाय उभा केला असून, त्यांना हा पुरस्कार समर्पित आहे. व्यवसायात सचोटी, कष्ट, सातत्य व प्रामाणिकपणा असल्याने यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. महेश शिंदे यांनी मानवी शरीरावर परिणाम करणारा दैनंदिन वापरातला खाद्यतेल महत्त्वाचा घटक आहे. बाजारात भेसळयुक्त व केमिकलयुक्त तेलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. शुध्द तेलाची निर्मिती करून एक प्रकारे आरोग्य सेवेचा काम साळवे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल सुभाष आल्हाट, डॉ. संतोष गिऱ्हे, आदिनाथ वनारसे, मेजर तुकाराम डफळ, डॉ. धनाजी बनसोडे, डॉ. बी.आर. रणनवरे, दिनेश शिंदे, अनिल साळवे, डॉ. सरिता माने, ॲड. सुनील तोडकर, डॉ. अनिल बोरगे, जालिंदर बोरुडे आदींनी साळवे यांचे अभिनंदन केले.
