राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूने तायक्वांदो स्पर्धेत विभागीय पातळीवर यश संपादन केले आहे. पुणे येथे झालेल्या विभागीय तायक्वांदो स्पर्धेत शाळेची खेळाडू कु. प्रांजल पोटे हिने सुवर्ण पदक प्राप्त केले.
तिचे छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण, सचिव प्रा. सोमनाथजी दिघे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रा. रावसाहेब पवार, सहकार्यवाह प्रा. रविंद्र चोभे व सर्व पदाधिकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप भोर सर्व शिक्षक वृंद व पालकांनी तिचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तिला क्रीडाशिक्षक अविनाश साठे सर यांचे लाभले.
मुख्याध्यापक संदीप भोर म्हणाले की, प्रांजल पोटे हिने विभागीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून आपल्या विद्यालयाचे व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. विद्यालयाच्या वतीने सातत्यपूर्ण खेळांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाचे हे फलित आहे. कठोर परिश्रम, सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वासाने खेळात यश संपादन करता येते. विद्यालय केवळ शिक्षणातच नव्हे, तर क्रीडा, संस्कृती आणि सर्वांगीण विकासातही विद्यार्थ्यांना घडविण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.