• Tue. Jul 1st, 2025

मार्केटयार्डमध्ये संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे भक्तीभावाने स्वागत

ByMirror

Jun 24, 2025

भाजीपाला कांदा फळफळावळ आडत्यांच्या असोसिएशनने केली जेवणाची व्यवस्था


आमदार जगताप यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक

नगर (प्रतिनिधी)- ज्ञानोबा माउली तुकाराम… चा गजर करीत शहरातील शहरातील मार्केटयार्ड येथे आगमन झालेल्या संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला विभागातील अहिल्यानगर भाजीपाला कांदा फळफळावळ आडत्यांच्या असोसिएशनने मोठ्या भक्तीभावाने स्वागत केले.


त्र्यंबकेश्‍वर (जि. नाशिक) येथून पंढरपूरकडे निघालेली ही दिंडीचे नुकतेच शहरात आगमन झाले असून, ही दिंडी दरवर्षीप्रमाणे मार्केटयार्डला दोन दिवसासाठी मुक्कामी होती. यावेळी ज्ञानोबा माउली तुकाराम, जयहरी विठ्ठल श्रीहरी विठ्ठल असा टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांचा भक्ती सोहळा मार्केटयार्डमध्ये भजन-किर्तनाने रंगला होता. दिंडीच्या आगमनाने संपूर्ण परिसर भक्तीमय होऊन प्रफुल्लीत झाला होता.


दिंडीतील सर्व वारकऱ्यांच्या जेवणाची सोय अहिल्यानगर भाजीपाला कांदा फळफळावळ आडत्यांच्या असोसिएशनच्या वतीने करण्यात आली होती. अन्नदानाचे नियोजन सर्व असोसिएशनच्या सभासदांच्या वतीने करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ दिंडीतील सर्व वारकरी, बंदोबस्ताला असलेले पोलीस बांधव, भाविकांनी घेतला.


आमदार संग्राम जगताप व माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी या उपक्रमास भेट देऊन संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शने घेतले. तर दरबर्षी राबविण्यात येणाऱ्या असोसिएशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, उपाध्यक्ष सुनील विधाते, दिलीप ठोकळ, महेंद्र लोढा, नंदकिशोर शिकरे, विजयकुमार बोरुडे, पांडूशेठ शिंदे, राहुल जाधव, भास्कर मांडोळे, कल्याण वाळके, पंकज कर्डिले आदी सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. महावीर पटवा यांनी भोजन व्यवस्था पाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *