• Tue. Nov 4th, 2025

15 ऑगस्ट रोजी संघर्षरत्न समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

ByMirror

Aug 13, 2025

विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा होणार गौरव

नगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा 15 ऑगस्ट रोजी संघर्षरत्न समाजभूषण पुरस्कार सोहळ्यात सन्मान केला जाणार आहे. संघर्षनामा प्रिंट ॲण्ड इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या (महाराष्ट्र राज्य) वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


सामाजिक, पत्रकारिता, उद्योग, अध्यात्म, राजकारण, समाजकारण आदी विविध क्षेत्रातील व्यक्तींना संघर्षरत्न जीवनगौरव व विविध पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. शुक्रवारी (दि.15 ऑगस्ट) दुपारी 1.00 वाजता तुळशीदास मंगल कार्यालय, पेडगाव रोड, श्रीगोंदा येथे विधान परिषदचे सभापती ना. प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असून, यावेळी सुदाम महाराज गोरख गुरुजी, पद्मश्री पोपटराव पवार, खासदार निलेश लंके, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार काशिनाथ दाते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, म्हाडा नाशिक विभागाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, उद्योजिका विजयाताई गरुडकर, वृद्धेश्‍वर मल्टीस्टेटचे चेअरमन विठ्ठलराव वाडगे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.


या सोहळ्याचे प्रमुख आयोजक मेजर भिमराव उल्हारे असून, निमंत्रक म्हणून माधव उल्हारे, मेजर निलकंठ उल्हारे व संतोष शिंदे परिश्रम घेत आहेत. संघर्षनामा संयोजक मंडळाच्या वतीने सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *