उपकर्णधार म्हणून करणार महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व
नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील फुटबॉल खेळाडू राणी कदम हिची 29 व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल निवड चाचणीत कदम हिची उत्कृष्ट खेळाची कामगिरी पाहून तिच्यावर महाराष्ट्र (डब्ल्यूआयएफए) संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
जयपूर राजस्थान येथे होणाऱ्या राजमाता जिजाबाई चषक 2024-25 या 29 व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत कदम ही उपकर्णधार म्हणून महराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या निवडीबद्दल अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, जोगासिंह मिनहास, सचिव रौनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीप जाधव, विक्टर जोसेफ, खजिनदार ऋषपालसिंह परमार, सहखजिनदार रणबिरसिंह परमार आदींनी तिचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीबद्दल कदम हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
