• Thu. Feb 6th, 2025

वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिलांसह रंगला हळदी-कुंकूचा कार्यक्रम

ByMirror

Feb 6, 2025

कस्तुरी फाउंडेशनच्या महिलांचा सामाजिक उपक्रम

वृद्धाश्रमातील महिलांच्या चेहऱ्यावर फुलविला आनंद

नगर (प्रतिनिधी)- वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने कस्तुरी फाउंडेशनच्या महिलांनी विळद घाट येथील मातोश्री वृद्धाश्रमात हळदी-कुंकूचा कार्यक्रम राबविला. यावेळी वृद्धाश्रमातील महिलांसह फुगड्या, मनोरंजनात्मक खेळ व उखाणे रंगले होते.


मोठ्या आपुलकीने हळदी-कुंकूसाठी आलेल्या महिला पाहून वृद्धाश्रमातील महिला भारावल्या. वृद्धाश्रमातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा सोहळ्यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. समाजातील घटक म्हणून वृद्धाश्रमातील महिलांसह कस्तुरी फाउंडेशनने हा उपक्रम राबविला. यावेळी सोनम दत्ता गाडळकर, डॉ. सुनिता लोडे, लता शिंगवी, अनुराधा वाघ, स्वाती गाडळकर, आशा झावरे, प्रियंका वालझडे, सारिका शिंदे, नीला मुळे, सविता शिंदे, सोनाली सोनवणे, उषा शेळके, ज्योती घोडके, पूनम दळवी, खांदवे मॅडम, मांडगे, जयश्री मेहेत्रे, प्रगती भोकरे, आशा बोरुडे, पूनम होळकर, आढाव मॅडम, ज्योती मिसाळ, दिपाली लगड, निशा देवडे, राजश्री भोजने, वैशाली पाटील, वैशाली सैंदर, जयश्री ढोबळे, तळवले, शकुंतला आंधळे, पुनम होळकर, मीरा होळकर, पुनम नहार, बांदल मॅडम, रेश्‍मा शिंदे आदी उपस्थित होत्या.


वृद्धाश्रमातील महिलांना वाण म्हणून गरजेच्या भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिलांनी उखाणे घेताना त्यांचे डोळे देखील पाणवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *