• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

अनिता काळे यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान पुरस्कार जाहीर

ByMirror

May 11, 2024

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आणि महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा तथा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांना श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पाचव्या काव्य संमेलनचे आयोजन करण्यात आले आहे. या काव्य संमेलनात पाहुण्यांच्या हस्ते काळे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती काव्य संमेलनाचे आयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे व युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे यांनी दिली.


अनिता काळे या सामाजिक क्षेत्रात मागील दोन दशकापासून सातत्याने सक्रीय योगदान देत आहेत. त्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, सर्वसामान्य घटकातील मुला-मुलींना विद्या दानाचे पवित्र कार्य करुन शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ज्युदो व लाठी-काठीचे प्रशिक्षण मोहिम चालवित आहे.

महिला सक्षमीकरणाचे कार्य करुन उत्तम प्रकारे महिला संघटन केले आहे. व्याख्यानातून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार घराघरात पोहचवून सक्षम पिढी घडविण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *