स्पर्धेला निर्भयपणे सामोरे गेल्यास यश निश्चित -एन.बी. धुमाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण नवनाथ विद्यालयात करण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून वर्षभरात कुस्ती, कबड्डी, हॉलीबॉल तसेच विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला होता.

नवनाथ विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात ही बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक एन.बी. धुमाळ, माजी सरपंच साहेबराव बोडखे, भागचंद जाधव, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, निळकंठ वाघमारे, नामदेव फलके, गोरख चौरे, मंदा साळवे, तृप्ती वाघमारे, सुवर्णा जाधव, मयुरी जाधव, राम जाधव, तेजस केदारी, अमोल वाबळे, भानुदास लंगोटे, प्रमोद थिटे आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
एन.बी. धुमाळ म्हणाले की, स्पर्धेला निर्भयपणे सामोरे गेल्यास यश निश्चित आहे. मनात भिती बाळगणारा व्यक्ती स्पर्धेत उतरण्यापूर्वीच पराभव पत्कारतो. विद्यार्थ्यांनी जीवनातील कोणत्याही स्पर्धेला न घाबरता सामोरे जाण्याचे त्यांनी आवाहन केले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, जीवनात मैदानी खेळ आनंद निर्माण करतो. तर खेळाने अपयश पचविण्याचे व संयमाने पुढे जाण्याचे गुण विकसीत होतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दिवसेंदिवस मैदानी खेळाचे महत्त्व कमी होत चालले आहे. विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच खेळाकडे वळण्याचे त्यांनी आवाहन केले. दहावी मधील पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मागील 27 वर्षापासून प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात येत असल्याचे त्यांनी माहिती दिली. माजी सरपंच साहेबराव बोडखे यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.