सद्धेश्वर व्यायामशाळा व मळथडी मित्र मंडळाच्या विविध उपक्रमांना महिला-युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आघोरी शिवभक्त देखावा व विसर्जन मिरवणूक ठरली आकर्षण
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे सिद्धेश्वर व्यायामशाळा व मळथडी मित्र मंडळ (दक्षिणमुखी हनुमान मंदिर) यांच्या वतीने गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सलग आठ दिवस रंगलेल्या या उत्सवात विविध सांस्कृतिक, पारंपरिक व स्पर्धात्मक उपक्रमांनी रंगत आनली होती.
उत्सवाच्या दरम्यान महिलांसाठी व युवतींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः होम मिनिस्टर या खेळासह इतर स्पर्धांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेश विसर्जन दिनी परितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्हे व बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी शरद झोडगे, महेश झोडगे यांच्यासह मित्र मंडळाचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विसर्जन मिरवणुकीत आघोरी शिवभक्ताचा देखावा सादर करण्यात आला. हा देखावा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरला. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचे पारंपरिक स्वर आणि भक्तिगीतांच्या वातावरणात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. ग्रामस्थांचा सहभाग, महिला व युवकांची उपस्थिती यामुळे नागरदेवळेतील गणेशोत्सव रंगतदार ठरला. गणेशोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महेशभाऊ झोडगे मित्र मंडळाने विशेष परिश्रम घेतले.