अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत शहरातील रुपीबाई बोरा न्यू इंग्लिश स्कूलचा खेळाडू पियूष सचिन वाघ याने सुवर्ण पदक पटकाविले. वाघ याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन आपल्या तलवारबाजीची स्पर्धेत छाप पाडली.

नुकतेच गोंदिया येथे शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा पार पडली. यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातून खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाघ याने 14 वर्षा आतील मुलांच्या सांघिक प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली.
वाघ हा इयत्ता नऊवी मध्ये शिकत आहे. त्याला अहमदनगर फेन्सिंग क्लबचे प्रशिक्षक सुनिल गोडळकर, ओंकार सुरग, वैष्णवी गोडळकर, सोमनाथ रोहकले, शाळेचे मुख्याध्यापक अजय बारगळ, क्रीडा शिक्षिका अंजली देवकर, सुनील चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.