• Mon. Jun 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

भिंगार देवांग कोष्टी समाज अध्यक्षपदी शिवम भंडारी यांची निवड

ByMirror

Dec 16, 2024
भिंगार देवांग कोष्टी समाज अध्यक्षपदी शिवम भंडारी यांची निवड

सलग तिसऱ्यांदा निवडीचा बहुमान

नगर (प्रतिनिधी)- भिंगार देवांग कोष्टी समाज अध्यक्षपदी शिवम प्रभाकर भंडारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नुकतीच भिंगारला देवांग कोष्टी समाजाची सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये भंडारी यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. तसेच नवीन मंदिराच्या कामाची सुरुवात करण्यात आली असून, मंदिराच्या कामासाठी मदत करण्याचे आवाहन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.


भिंगार मधील देवांग कोष्टी समाजातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक घेण्यात आली. यावेळी अनिल सोळसे, संदिप टेके, विजयकुमार भंडारी, शिवकुमार वाघुंबरे, प्रविण खारपे, सुनील विधाते, माऊली डिगे, राजू कुरकुटे, उमाकांत अस्मार, गजानन भंडारे, रमेश बोंदर्डे, अच्युत चिणके, दिपक चिणके, राहुल लिपारे, शंकर कृष्णे, शंकर खर्पे, उमाकांत आस्मार, बाळकृष्ण कुमठेकर, कल्याण कांबळे, नवनाथ सगम, ज्ञानेश्‍वर विधाते, गुरसाळी भाऊ आदी उपस्थित होते.


शिवम भंडारी यांचे विविध क्षेत्रात सामाजिक कार्य सुरु असून, त्यांचे समाजासाठी असलेले योगदान व कार्य लक्षात घेऊन त्यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. भंडारी यांनी येणाऱ्या काळात समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहून समाजाच्या उज्वल भवितव्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *