सामाजिक उपक्रमांचा समावेश असलेल्या भगवा सप्ताहाचे उद्घाटन
नगर (प्रतिनिधी)- शहरात शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची 99 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मंगलगेट येथील शिवसेनेच्या शहर संपर्क कार्यालया समोर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश असलेल्या भगवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाले, शहर प्रमुख सचिन जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक दिपक खैरे, दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, माजी नगरसेविका अश्विनी जाधव, भिंगार शहर प्रमुख सुनिल लालबोंद्रे, पोपट पाथरे, आनंदराव शेळके, रणजीत परदेशी, युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, शहर प्रमुख महेश लोंढे, दिगंबर गेंट्याल, रविंद्र लालबोंद्रे, अमोल हुंबे, विकी लोखंडे, योगेश भोकरे, महिला आघाडीच्या शहर प्रमुख पुष्पाताई येळवंडे, शोभना चव्हाण, सुनिता बहुले, तृप्ती साळवे, सलोनी शिंदे, सुनिल भिंगारदिवे, प्रा. संजय शितोळे, काका शेळके, नामदेव लंगोटे, अंगद महानवर, पांडूरंग घोरपडे, घनशाम सापते, विनोद शिरसाठ, अक्षय भिंगारे, रोहित पाथरकर, विजय जाधव, समीर गवळी, गोरक्षनाथ वैरागर, नागेश शिंदे, मच्छिंद्र शिंदे, महेश थोरवे, स्वप्निल भरड, अनिकेत आरडे, परेश खराडे, यश दुबे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अनिल शिंदे म्हणाले की, शिवसेना स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती भगवा सप्ताहातंर्गत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्वाचा विचार घेऊन काम करत असून, बाळासाहेबांचा वारसा ते पुढे घेऊन जात आहे. लवकरच शहरात आगामी काळा मध्ये मोठे राजकीय बदल घडणार असून, शिवसेनेला तेच पुनर्वैभव प्राप्त होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बाबुशेठ टायरवाले म्हणाले की, स्व. बाळासाहेबांनी नेहमीच गोर गरीब जनतेला ताकद व नेतृत्व देण्याचे काम केले. सर्वसामान्यांच्या हातात सत्ता दिली. संपूर्ण देशाला ज्वलंत हिंदुत्वाचे विचार त्यांनी दिले. छातीठोकपणे भूमिका घेणारे ते एकमेव नेतृत्व होते. शिवसेनेने काँग्रेस बरोबर जाऊन हिंदूत्वाचे विचार सोडले, यासाठी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खरे शिवसैनिक एकवटले असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिन जाधव म्हणाले की, आपल्या कार्याने व विचाराने स्व. बाळासाहेब ठाकरे जनसामान्यांचे हिंदूहृदय सम्राट बनले. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेण्यासाठी शहरात भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यांचे ज्वाजल्य हिंदूत्वाचे विचार प्रत्येक कार्यकर्त्याला स्फुर्ती देणारे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या विचारांचे खरे वारसदार आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देवून शिवसेनेची वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.