मतदार जागृतीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमाची दखल
नगर (प्रतिनिधी)- लोकसभा, विधानसभा निवडणूकीत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवून दिलेल्या योगदानाबद्दल निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान करण्यात आला.
जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने 15 व्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार जागृती करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते डोंगरे यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त यशवंत डांगे, उपजिल्हाधिकारी (निवडणुक शाखा) राहुल पाटील, प्रांत अधिकारी सुधीर पाटील, शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे आदी जिल्हा प्रशासनातील अधिकारी वर्ग उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे यांनी नुकतेच झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी श्री नवनाथ युवा मंडळ, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून मतदार जागृतीचे विविध उपक्रम राबविले. या उपक्रमांची दखल घेऊन जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने डोंगरे यांचा सन्मान करण्यात आला. मतदार दूत डॉ. अमोल बागुल यांनी डोंगरे यांचे अभिनंदन केले.