• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात शिक्षक दिनी रंगणार ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

ByMirror

Jul 31, 2025

शिक्षकांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्काराने होणार गौरव


प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे शिक्षक दिनानिमित्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन असून, यामध्ये राज्यभरातील ज्येष्ठ साहित्यिक व कवी सहभागी होणार असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली.


5 सप्टेंबरला होणाऱ्या साहित्य संमेलनानिमित्त गावातून ग्रंथ दिंडी काढली जाणार आहे. या दिंडीत साहित्यिक व कवी सहभागी होणार आहेत. यानंतर परिवार मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत यांचे परिसंवाद आणि व्याख्याने आयोजन करण्यात आले आहे. मध्य सत्रात कवी संमेलन रंगणार असून, त्याद्वारे ग्रामीण भागातील काव्यप्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्रीचेही आयोजन करण्यात आले आहे.


संमेलनात पाहुण्यांच्या हस्ते सामाजिक, साहित्य, आरोग्य, शैक्षणिक, कला, क्रीडा, उद्योग व पर्यावरण आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी इच्छुकांनी प्रस्ताव 25 ऑगस्ट 2025 पर्यंत पै. नाना किसन डोंगरे, अध्यक्ष, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, निमगाव वाघा, ता. नगर, जि. अहिल्यानगर – 414005. या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पै. नाना डोंगरे यांच्याशी 9226735346 / 8605775261 या नंबरवर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *