• Mon. Jul 21st, 2025

हळदी-कुंकूच्या कार्यक्रमातून अंधश्रद्धा सोडून वैज्ञानिक युगाचा स्वीकार करण्याचा संदेश

ByMirror

Feb 8, 2024

यशवंती मराठा महिला मंडळाचा उपक्रम

हळदी-कुंकू एकमेकींना जोडणारा समारंभ -मायाताई कोल्हे

अहमदनगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने अंधश्रद्धा सोडून वैज्ञानिक युगाचा स्वीकार करण्याचा संदेश देत हळदी-कुंकूचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यामध्ये महिलांनी अनिष्ठ रुढी-परंपरांच्या उतरंडी नष्ट करुन संस्कृती जोपासत पुढे जाण्याचा संकल्प केला.


हळदी-कुंकू कार्यक्रमाचे प्रारंभ राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करुन करण्यात आले. सावेडी येथील मिराज प्री स्कूल येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी महिला मंडळाच्या संस्थापिका मायाताई कोल्हे, जिल्हाध्यक्षा गीतांजली काळे, शहराध्यक्षा मिरा बारस्कर, लीना नेटके, डॉ. जैन, दिपाली बारस्कर, शर्मिला कदम, उर्मिला वाळके, मंगल शिर्के, मंगल काळे, आशाताई शिंदे, सुरेखा खैरे, राधिका शेलार, राजश्री पोहेकर, भापकर, काटे, डॉ. कवडे, डॉ. मराठे, रचना काकडे, विद्या साळुंखे, आशा कोहक, प्रतिभा भिसे, वर्षा लगड, ज्योती गंधाडे, अर्चना मोहिते, कल्पना भंडारे, मिकुरवाळे, सारिका खांदवे, मोहे, शिरसाठ, पालवे, सीमा धामणे, राजश्री शेळके आदींसह महिला मोठ्या संख्येने महिला होत्या.


मायाताई कोल्हे म्हणाल्या की, हळदी कुंकू कार्यक्रमातून महिलांच्या चेहऱ्यावर आनंद उमळते. तर विचारांची देवाण-घेवाण होवून सामाजिक चळवळीत महिला सक्रीय होत असतात. हळदी-कुंकू फक्त कार्यक्रम नसून, एकमेकींना जोडणारा समारंभ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


गीतांजली काळे यांनी सर्व महिलांना वाण देऊन घरातील आनंदाचे वातावरण कायम ठेवून स्वतःही आनंदी राहण्याचा सल्ला दिला. शहराध्यक्षा मिरा बारस्कर यांनी हळदी-कुंकू लावताना कुठलाही भेदभाव ठेवू नका. प्रगती साधण्यासाठी विज्ञान युगाचा स्वीकार करुन पुढे जावे लागणार असल्याचे स्पष्ट केले.


महिलांसाठी उखाणे, संगीत खुर्ची, वेशभूषा मॅचींग, तंबोला आदी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक स्पर्धा पार पडल्या. मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होवून महिलांनी आनंद लुटला. या विविध स्पर्धेत शोभा भालसिंग, अनिता मोरे, मंगल काळे, वैशाली उत्तेकर, सुरेखा बारस्कर, जया कोल्हे, अर्पणा शेलार विजेत्या ठरल्या. स्पर्धेचे परीक्षण डॉ. जैन यांनी केले. प्रास्ताविकात रूपाली ताकटे यांनी यशवंती मराठा महिला मंडळाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका गाडे यांनी केले. आभार शारदा तांबे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *