रात्र शाळा ही संकल्पना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी रुजवली -ॲड. सुभाष काकडे
नगर (प्रतिनिधी)- रात्र शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून, त्यांना विकासाच्या प्रवाहात उभे करण्याचे कार्य भाई सथ्था नाईट हायस्कूल करत आहे. रात्र शाळा ही संकल्पना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी रुजवली आहे. पुणे येथील भिडे वाड्यात त्यांनी विद्यार्जनाचे कार्य केले. हा वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य ही संस्था करत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुभाष काकडे यांनी केले.

हिंद सेवा मंडळ संचलित भाई सथ्था नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे 73 वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ॲड. काकडे बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक श्रीराम थोरात, सुरेश ढवळे, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, माजी अध्यक्ष मधुसूदन मुळे, बालरोगतज्ञ डॉ. रमेश कोठारी, संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ. पारस जी कोठारी, नाईट हायस्कूलचे प्राचार्य सुनिल सुसरे, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य अनंत देसाई, जगदिश झालानी, ज्योती कुलकर्णी, शालेय समिती सदस्य संगीता ॲबट, विलास बडवे, अलकाताई मुळे दादा चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले सर, मेहेर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अनुरूप झगडे, सिताराम सारडा विद्यालय चे परिवेक्षक गोविंद धर्माधिकारी, नंदे सर, महाजन सर, शिंदे सर आदींसह पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. पारस कोठारी यांनी दिवसा अर्थार्जन करुन रात्री शिक्षणाने विद्यार्थी आपले भवितव्य घडवित आहे. मासूम संस्थेने केलेल्या मूल्यांकनात महाराष्ट्रातील सर्वात मोठी रात्रशाळा म्हणून भाई सथ्था नाईट हायस्कूल असून, नाईट शाळेच्या राज्याच्या प्रथम दहा क्रमांकाच्या गुणवत्ता यादीत इयत्ता दहावी मधील चार विद्यार्थी चमकले आहे. यावर्षी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वेटिंगवर ठेवावे लागले. सर्वात जास्त 273 महिला प्रवेशित झाल्या असून, मासूम संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारे सहकार्य व शाळेतील सोयी-सुविधेबद्दल त्यांनी माहिती दिली.
प्राचार्य सुनिल सुसरे यांनी रात्र शाळेतील गुणवत्तेचा वार्षिक अहवाल सादर करुन इयत्ता दहावी मध्ये राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकलेले विद्यार्थी, कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आढावा घेतला. पाहुण्यांचा परिचय स्वाती होले यांनी करुन दिला.
अशोक कडूस म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा प्रवाह बदलत आहे. दहावी, बारावीत किती टक्के गुण पडले? या गुणवत्तेला महत्त्व न राहता मुलांच्या कौशल्यावर त्याची प्रगती ठरणार आहे. अनेक क्षेत्र विद्यार्थ्यांची वाट पाहत असून, विविध संधी निर्माण झाल्या आहेत. शिक्षणाने प्रगल्भता आणण्याचे काम होणार आहे. जीवनात कौशल्य आत्मसात करण्यासाठी शिक्षण असण्याची गरज आहे. केवल अर्थार्जनासाठी शिक्षण नसून समाज परिवर्तनाचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. तर निष्ठेने काम करुन सेवाधर्माने ब्रॅण्ड निर्माण करण्याचे त्यांनी आवाहन केले.
मधुसूदन मुळे यांनी रात्र शाळेतील प्रत्येक विद्यार्थी एक कादंबरी आहे. नाईट स्कूलचे शिक्षक पालकांप्रमाणे विद्यार्थ्यांची काळजी घेऊन त्यांना दिशा देत असल्याचे सांगितले. डॉ. रमेश कोठारी यांनी आयुष्याच्या प्रगतीची सूत्रे सांगितली. शिरीष मोडक यांनी नाईट स्कूलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा फायदा घेऊन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी प्रवाहात येण्याचे आवाहन केले.
कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात यश मिळविणाऱ्या रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली साताळकर व अनुराधा दरेकर यांनी केले. आभार शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब गोरडे यांनी मानले. यावेळी शिवा शिंदे, कैलास करांडे, अलकाताई मुळे, सुभाष येवले, अनुरिता झगडे, धर्माधिकारी सर, दीपक शिंदे, कांबळे सर, शरद पवार, गजेंद्र गाडगीळ, महादेव राऊत, अमोल कदम, शिवप्रसाद शिंदे, संदेश पिपाडा, मंगेश भुते, अशोक शिंदे, कैलास करांडे, प्रशांत शिंदे, अनिरुद्ध देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, अविनाश गवळी, मनोज कोंडेजकर, कैलास बालटे, उज्वला साठे, वैशाली दुराफे, स्वाती होले आदींसह शालेय शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते.