पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
समाजात फुले, शाहू, आंबेडकर विचाराने कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव
नगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन 13 एप्रिल रोजी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय टिळक रोड येथे करण्यात आले आहे. जयंती उत्सवानिमित्त व्याख्यान, प्रबोधन, विविध स्पर्धा, मोफत राज्यस्तरीय माळी वधु-वर मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती मुख्य संयोजक ॲड. महेश शिंदे, पोपटराव बनकर, गणेश बनकर व स्वाती डोमकावळे यांनी दिली.
जय युवा अकॅडमी, रयत प्रतिष्ठान, जनवार्ता, क्रांतीज्योती बहुउद्देशी संस्था, समृद्धी बहुउद्देशीय महिला संस्था, सावित्रीबाई फुले महिला संस्था आदींच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात विविध क्षेत्रात फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्ती, शासकीय कर्मचारी, अधिकारी, सामाजिक संस्था, महिला क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात, आदर्श ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, क्रीडा क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, पर्यावरण, धर्मिक, उद्योग व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तींना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. इच्छुक व्यक्तींनी आपले प्रस्ताव 30 मार्च पर्यंत ॲड. महेश शिंदे, पावन गणपती मंदिरा शेजारी, जुन्या कोर्टामागे, टांगे गल्ली, अहिल्यानगर येथे पाठवण्याचे म्हंटले आहे. अधिक माहितीसाठी 9004722330 व 9921810096 या क्रमांकावर संपर्क साधावा.
जयंती उत्सवासाठी ॲड. धनंजय जाधव, नितीन डागवाले, जयश्री शिंदे, मंगल भुजबळ, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, सिताराम जाधव, प्रकाश डोमकावळे, शरदभाऊ झोडगे, अंबादास गारुडकर, सुवर्णाताई जाधव आदी यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.