भाविकांना प्रसाद वाटप
अध्यात्म, धार्मिक विचाराला चालना देऊन भावीपिढीत संस्कार रुजवावे लागणार -सविता कोटा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दातरंगे मळा येथील श्री सूर्यमुखी गुरू दत्तदिगंबर मंदिरात श्री सूर्यमुखी गुरू दत्तदिगंबर युवा विकास प्रतिष्ठान (ट्रस्ट) च्या वतीने महाआरती करण्यात आली. भाजपच्या शहर जिल्हा सरचिटणीस सविता कोटा व प्रकाश कोटा परिवाराच्या हस्ते आरती पार पडली.

आरतीनंतर उपस्थित परिसरातील भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे चंदूकाका सब्बन, रमेश गुंडू, अजय म्याना, दिपक गुंडू, किरण कोडम, श्रीनिवास इप्पलपेल्ली, श्रीकांत येमूल, शुभम बुरा, सत्यनारायण एकलदेवी, वैभव कस्तुरी, ऋषिकेश दसकन, सतीश चिंता, सतीश इप्पलपेल्ली, शुभम येनगूपटला, शुभम शिरसूल, आदेश गुंडू, अवी पंतम, अमोल मच्चा, नरेश कोटा, किरण गरुड, विनायक क्यातम, अजय लयचेट्टी, रोहिणी कोडम, रेखा गरूड, दर्शना वाघमारे, जयश्री क्यातम, सुनिता न्यालपेल्ली, तनया भापकर आदींसह परिसरातील भाविक, महिलांसह अबालवृध्द मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सविता कोटा म्हणाल्या की, अध्यात्म, धार्मिक विचाराला चालना देऊन भावीपिढीत संस्कार रुजवावे लागणार आहे. धार्मिक उपक्रमातून समाजाला दिशा व ऊर्जा मिळत असते. नव्या पिढीचे प्रबोधन करुन त्यांच्यात संस्कार व अध्यात्मिक विचार रुजल्यास सशक्त समाजाची निर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकाश कोटा यांनी श्री सूर्यमुखी गुरू दत्तदिगंबर युवा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु असलेले धार्मिक व सामाजिक कार्य दिशादर्शक आहे. हिंदू संस्कृती जोपासून धार्मिक विचार देण्याचे कार्य प्रतिष्ठान करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.