अहमदनगर (प्रतिनिधी)- शाहूनगर येथील ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशनच्या लंडन किड्स प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. चिमुकल्या मुलांनी रंगीबेरंगी पोशाख परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्याचे बहारदार सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नगरसेवक मनोज कोतकर यांच्या हस्ते झाले. डॉ. शरद मोहरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र शिंदे, सुमन कुरेल, संभाजी पवार, उद्योजक जालिंदर कोतकर, बच्चन कोतकर, मधुकर चिपाडे, संग्राम कोतकर, भैरू कोतकर, अजित कोतकर, सुमित लोंढे, संस्थेचे अध्यक्ष दीपक तागडे, सचिव संदीप भोर, प्रसाद जमदाडे, मुख्याध्यपिका रुचिता जमदाडे, प्रा.शाहरुख शेख आदीसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनोज कोतकर म्हणाले की, लहान मुलांवर संस्कार रुजवून त्यांचे भविष्य घडवण्याचे कार्य शिक्षक करतात. पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत मुलांच्या भविष्याचा पाया रचला जातो. आजची लहान मुले उद्याचे भविष्य असून, अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.शरद मोहरकर यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाचा संदेश दिला. प्रास्ताविकात रुचिता जमदाडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.