ग्रामीण खेळाडूंना क्रिकेटचे दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी तिरमल क्रिकेट ॲकॅडमीचा पुढाकार
मुला-मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना क्रिकेटचे दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी तिरमल क्रिकेट ॲकॅडमीच्या वतीने राहुरी येथे लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ झाले. या प्रशिक्षण वर्गाला शालेय मुला-मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना पुढे आणण्याचा अकॅडमीचा उद्देश असून, या दृष्टीकोनाने प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले आहे.
या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे व उद्योजक देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक घन:श्याम सानप, संतोष जाधव, रितेश चौरसिया, राहुरी कॉलेजचे क्रीडा प्रमुख बर्डे सर, ज्येष्ठ तायक्वांदो प्रशिक्षक डॉ.नारायण माळी, पालक राजेंद्र उगलमुगले, भारत शेडगे, वाल्मीक पारधी, राज्य पातळीवरील क्रिकेट खेळाडू अक्षदा बेलेकर, स्वामिनी जेजुरकर, ऐश्वर्या चौरसिया, वृषाली पारधी, तृप्ती उगलमुगले, संतोषी भिसे, तनुजा शेडगे, तनिष्का मगर, श्रेया सोनवणे, सिद्धी निकाळजे आदी खेळाडू उपस्थित होत्या.
खेळाडूंना क्रिकेट या खेळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील नियम व राष्ट्रीय पातळी पर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
श्रीकांत तिरमल यांनी मुलामुलींच्या सर्वांगीन विकासासाठी आणि उत्कृष्ट ग्रामीण खेळाडूंमध्ये क्रिकेट खेळ विकसित करण्यासाठी योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळणे खूप गरजेचे असल्याचे सांगितले. शिबिर यशस्वी करण्यासाठी अभिजीत गावडे, निलेश बाचकर, यश पवार, कृष्णा चव्हाण, सुरज लांबे, रोहित उंडे परिश्रम घेत आहे.